ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 93 व्या वर्षी दुःखद निधन. ज्यांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये 12 हजारापेक्षा जास्त गाणी आणि वीस पेक्षा जास्त भाषांमध्ये ही आजरामर गाणी गायली.साधारणतः 1950 पासून मराठी मधून त्यांनी त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात केली अशा या गायिका की ज्यांच्या फक्त गाण्यासाठी काही चित्रपट गाजले.त्यांना आज सर्व संगीत प्रेमी कडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.70 ते 75 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी रसिकांना अतिशय आजरामर अशी गाणी दिली.आज त्या आपल्यामध्ये नाहीत पण इथून पुढे अनेक दशक नाही पण काही शतकांपर्यंत तो आवाज आपल्याला आशा दीदी यांची आठवण करून देत राहील.आणि आपण ज्या वेळी दुःखात असू त्यावेळेस आपल्या दुःखावर मायेची फुंकर घालण्याचे काम त्यांचे आजारामर संगीत करेल यात तीळमात्र शंका नाही.त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून येणार नाही.आम्ही बीबीएल न्यूज तर्फे ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

