महात्मा फुले द्विशताब्दी जयंती निमित्त , जाणून घेऊया महात्मा फुले यांची आर्थिक स्थिती काय होती. सर्वसाधारणपणे समाज सुधारक म्हटलं की आपली एक धारणा असती की त्यांची आर्थिक स्थिती ही सर्वसाधारण किंवा बेताची अशी असते आणि त्यांनी केलेले समाजकार्य हेच आपल्या मनावरती आधी राज्य गाजवून जाते.पण महात्मा ज्योतिराव फुले यांची आर्थिक स्थिती पाहिल्यानंतर आपल्या असे लक्षात येते की एवढे गर्भ श्रीमंत किंवा आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम असताना सुद्धा त्यांनी आपली सर्व संपत्ती समाजासाठी अतिशय उदार अंतकरणाने खर्च केली. 1869 मध्ये टाटा समूहाची एका वर्षाची आर्थिक उलाढाल ही 20000 रुपये होती त्याचवेळी 1869 मध्ये महात्मा फुले यांच्या पुना कम र्शियल इन कॉन्ट्रॅक्टींग कंपनीची वार्षिक उलाढाल 21 हजार रुपये होती. इतिहास अभ्यासक हरी नरके यांच्या लेखानुसार महात्मा फुले यांच्या कंपनीची मुख्य कामे कात्रज चा बोगदा,येरवड्याचा पूल, खडकवासला धरणाचा कालवा,मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत,भायखळा पूल,परळ चे रेल्वे वर्कशॉप,मुंबईतील अनेक कापड गिरण्या भंडारदरा जलाशय,बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांचा लक्ष्मी विलास राजवाडा या आणि अशा अनेक इमारती निर्मिती मधून मिळालेल्या आर्थिक फायद्यातून त्यांनी फक्त आणि फक्त समाजकार्य केले याबरोबरच महात्मा फुले यांच्याकडे सोन्याच्या दागिन्यांचे साचे बनवण्याची भारतातील होलसेल एजन्सी होती तसेच महात्मा फुले यांच्याकडे 200 एकर शेती सुद्धा होती त्यामधून उत्पन्न झालेला माल ते रेल्वेद्वारे मुंबई येथील बाजारपेठेमध्ये पाठवत होते त्यांच्या उदार मनाचे कल्पना येण्यासाठी एक प्रसंग 1882 मध्ये लोकमान्य टिळक यांच्यावरील मुंबई उच्च न्यायालयातील खटल्यामध्ये त्यांना जामीन घेण्यासाठी त्यावेळी दहा हजार रुपये महात्मा फुले यांनी दिले होते त्यावेळेस सोन्याचा भाव दहा रुपये तोळा असा होता आजच्या व्यवहारिक भाषेत बोलायचं झालं तर त्यांनी टिळकांसाठी एक हजार तोळे सोने खरेदी करता येईल एवढी रक्कम फक्त जामिनासाठी खर्च केली. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे आदरणीय महात्मा ज्योतिराव फुले हे खऱ्या अर्थाने मनाने आणि आर्थिक स्थितीने सुद्धा अतिशय श्रीमंत होते यावरून त्यांची वैचारिक पातळी आणि देश आणि समाजाबद्दल त्यांची तळमळ लक्षात येते . आज आपण त्यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाची सुरुवात करत आहोत याबद्दल पुन्हा एकदा त्यांच्या महान कार्यास विनम्र अभिवादन

