आरोग्य

भारत औषधं उपचाराची जागतिक बाजारपेठ

भारत औषधं उपचाराची जागतिक बाजारपेठ

WHO चा स्थापना दिवस म्हणजेच 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आज आपल्या आयुष्यातील प्रत्येकाच्या दैनंदिन खर्चामध्ये आरोग्यावर होणारा खर्च हा प्रथम क्रमांकावर आहे दुसऱ्या स्थानावर शिक्षण आणि तिसऱ्या स्थानावर आपण बचत किंवा इतर बाबीचा समावेश करतो. आज असे एकही घर नाही ज्या घरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब या आजारांचा पेशंट नाही. त्यामुळे मागील 25 ते 30 वर्षांमध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे भारत हा औषध उपचारांची जागतिक बाजारपेठ म्हणून नावारूपास आलेला आहे. ही बाब निश्चितच कौतुकास पात्र नाही यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या मध्ये काही बदल करणे गरजेचे आहे.अनावधानाने शारीरिक श्रम करण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे आणि बैठे काम करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामध्येच मेट्रो सिटी मधील नाईट लाईफ कल्चर हे आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याचे मुख्य कारण आहे फक्त आणि फक्त पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याच्या नादामध्ये भारतीय मध्यमवर्ग आज जंक फूड किंवा पॅकिंग फूड आपल्या आहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर करत आहे ज्यामुळे आपले आरोग्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये धोक्यात येत आहे आज जागतिक आरोग्य दिनी आपण असा संकल्प केला पाहिजे की आपण जे खातो ते अन्न जिवंत असले पाहिजे म्हणजे ते काही ठराविक कालावधीनंतर खराब झाले पाहिजे उदाहरणार्थ चपाती भाकरी, भात फळे हे काही कालावधीनंतर खाण्यायोग्य रहात नाहीत पण त्याऐवजी पॅकिंग मध्ये मिळणारे बिस्किट चॉकलेट्स किंवा अन्य प्रोसेस्ड फूड्स यांना महिने आणि त्यापेक्षाही अधिक काळ काहीही होत नाही याचा अर्थ ते जिवंत आहार नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे आपण जिवंत राहण्यासाठी आहार घेतो मग तो आहार सुद्धा जिवंत असला पाहिजे मृत आहार म्हणजे प्रोसेस फुड जर आपण बंद केले तर आपण आपल्या आरोग्याच्या 60 ते 70 टक्के समस्या पासून निश्चित सुटका मिळू शकतो त्यामुळे आम्ही या माध्यमातून सर्व वाचकांना विनम्र आवाहन करतो की आपण जागतिक आरोग्य दिनी असा संकल्प करूया की आपण जास्तीत जास्त घरगुती बनवलेले आणि ताजे स्वच्छ आहाराचे सेवन कराल जेणेकरून आपल्या आरोग्यावरील औषध उपचारावर होणारा खर्च आपणाला कमी करता येईल आणि आपणाला आपले आयुष्य आनंदात आणि निरोगी जगता येईल धन्यवाद

शेअर करा:
BBL News