राजकारण 🔴 BREAKING

फुलंब्रीतून मंगेश दादा साबळे यांचा SP ऑफिसवर धडक मोर्चा

फुलंब्री (प्रतिनिधी) –

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेत मंगेश दादा साबळे यांनी आज फुलंब्री येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयावर धडक मोर्चा काढला. स्वतःवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर ते स्वतःहून अटक करून घेण्यासाठी कार्यालयाकडे रवाना झाले.

यावेळी बोलताना साबळे यांनी फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण आणि त्यांचे पती अतुल चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी दावा केला की, अतुल चव्हाण यांनी तब्बल ४ हजार कोटींचा घोटाळा केला असून टेंडर प्रक्रियेत मोठे गैरव्यवहार झाले आहेत.

साबळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आवाहन करत या प्रकरणाची SIT मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

"शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणे जर गुन्हा असेल, तर असे हजार गुन्हे अंगावर घेण्यास मी तयार आहे," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

याशिवाय, जर या प्रकरणाची चौकशी तात्काळ सुरू झाली नाही, तर फुलंब्री येथून मुंबईपर्यंत रथयात्रा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, फुलंब्री येथे पोहोचताच स्थानिक शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साबळे यांचे स्वागत केले आणि त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवला.

टॅग्स: # Mangesh Sabale Video
शेअर करा:
BBL News