राजकारण

साहेब चुकले

साहेब चुकले

शरदचंद्र पवार मागील 60 वर्षा पासून सक्रिय राजकारणात, 4 वेळा मुख्यमंत्री, माजी सरक्षणमंत्री, जाणता राजा, चालत बोलत राजकीय विद्यापीठ, यू टूर्न चे जनक, ज्यांच्या नावा शिवाय देशाचे राजकारण अपूर्ण त्यांनी काल वयाच्या 85 वर्षी राज्य सभेचे खासदार म्हणून शपथ घेतली.पण प्रकृती अस्वस्थ त्यामुळे ते व्हीलचेअर वर येऊन त्यांनी वरील पदाची शपथ घेतली. त्यावेळेस एक बाब नकळत जाणून गेली की राजकारणातील चाणक्य चुकला तर नाही ना,आज त्यांच्या पक्षांमध्ये अनेक तरुण,जाणकार,अभ्यासू व्यक्ती असताना सुद्धा स्वतःच्याच नावाचा आग्रह का कारण पवार साहेबांनीच आज महाराष्ट्रामध्ये राजकारणात वजनदार समजले जाणारे अनेक नेते घडवले ज्यामध्ये आर आर आबा, आदरणीय जयंत पाटील यासारख्या दिग्गजांची नावे घेता येतील.तरुण नेतृत्वाला संधी देणार पहिलं नाव म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब.असा इतिहास असताना आणि आज पुन्हा त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी असताना.स्वतःचे नाव या पदासाठी का सुचवले ते म्हणजे न सुटणारे कोडे.त्यांच्या वरती श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांच्या मनामध्ये येणारा प्रश्न एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या निर्णयावर शंका घेण्याइतपत निश्चितच आपण तेवढे ज्ञानी नाही पण त्यांना संधी होती वेगळा निर्णय घेण्याची,मग त्यामागे काही पक्षांतर्गत नाराजी किंवा इतर काही राजकीय गणित,परिस्थिती कोणतीही असो पण ज्या प्रकारे न्यूटन एक वेळेस चुकला त्याप्रमाणे साहेब सुद्धा चुकले असे म्हणायला इतिहासकारांना वाव आहे.साहेबांचे पूर्ण राजकीय चरित्र, राजकीय जीवन हा म्हणजे त्यांनी घेतलेल्या निर्णया मागची भूमिका त्यांनी खंबीरपणे लोकांसमोर मांडली.मग त्यांच्या अनेक निर्णयापैकी एक निर्णय म्हणजे मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर.तो निर्णय त्यांनी मनामध्ये आणला आणि पूर्णत्वास नेला सुद्धा. त्याचे अनेक पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळी वरती उमटले प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये पण त्याचे पडसाद उमटले,पण पवार साहेबांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करताना परिणामांची चिंता केली नाही. मग आज काय कारण.? राज्यसभेसाठी आपण अशा व्यक्तीचे नाव देतो,की जी व्यक्ती एखाद्या क्रीडा क्षेत्रात, कलाक्षेत्रात,वैज्ञानिक क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये ज्ञानी असते किंवा त्यांचा अनुभव दांडगा असतो.पण ते लोकमाताच्या आधारे एखाद्या ठराविक मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाहीत त्यासाठी संविधानाने राज्यसभा ही केलेली एक सोय असते. जेणेकरून संसदे सारख्या पवित्र सभागृहामध्ये अनेक क्षेत्रातील ज्ञानी लोकांचा सहभाग असावा आणि त्यांना सुद्धा देशाचे भवितव्य किंवा देशाच्या कायद्याच्या सभागृहामधील दिशा ठरवण्यासाठी त्यांना त्यांचे योगदान देता येईल.मग अशा सभागृहामध्ये वयाच्या 85 व्या वर्षी व्हील चेअर वरून येऊन शपथ घेऊन तुम्ही काय साध्य केले ? असा प्रश्न जन माणसांमध्ये येतो.आज जरी त्यांचे वय 85 असले तरी त्यांना दीर्घायुष्य लाभावे ही सर्व राजकीय,सामाजिक आणि सर्व क्षेत्रातील लोकांची एक प्रांजळ इच्छा.पण पुन्हा पुन्हा एकच प्रश्न की साहेब चुकले का ? किंवा साहेबांचा निर्णय समजून घेण्यासाठी आपण अजूनही कुठे कमी पडत आहोत का? या प्रश्नाचे उत्तर . शोधण्याचा प्रामाणिक प्रयन्त आहे.

शेअर करा:
BBL News