शेती

वीज चमकणे कोसळणे पहा काय उपयोजना जनतेला सतर्कतेचा इशारा

वीज चमकणे कोसळणे पहा काय उपयोजना जनतेला सतर्कतेचा इशारा


⚡ “वीज चमकणे/कोसळणे : नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन”

बीड प्रतिनिधी – अनिल आरगडे :

राज्यात सध्या हवामानात अचानक बदल होत असून वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी, तसेच मोकळ्या जागेत असणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. योग्य खबरदारी घेतल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी टाळता येऊ शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

👉 महत्वाच्या सूचना :

‘दामिनी’ अ‍ॅपद्वारे विजेचा अंदाज तपासा

आकाशात काळे ढग व कडकडाट सुरू होताच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्या

झाडाखाली, मोकळ्या मैदानात किंवा उंच ठिकाणी उभे राहू नका

मोबाइल व विद्युत उपकरणांचा वापर टाळा

धातूच्या वस्तू व पाण्यापासून दूर राहा

घराबाहेर असल्यास त्वरित सुरक्षित इमारत किंवा वाहनात जा

तसेच, विजेचा धक्का बसलेल्या व्यक्तीस तातडीने CPR देऊन वैद्यकीय मदत मिळवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

📞 आपत्कालीन संपर्क क्रमांक: १०७७ / १०७० / ११२

नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा:
BBL News