शेती

कर्ता शेतकरी निवासी प्रशिक्षणासाठी सह्याद्री फार्म्सचे आयोजन

कर्ता शेतकरी निवासी प्रशिक्षणासाठी सह्याद्री फार्म्सचे आयोजन

कर्ता शेतकरी निवासी प्रशिक्षणासाठी सह्याद्री फार्म्सचे आयोजन; शेतकऱ्यांमध्ये उद्योजकीय मानसिकता विकसित करण्यावर भर


नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री फार्म्स यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विशेष “कर्ता शेतकरी” निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले असून, शेतीतील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी उद्योजकीय दृष्टीकोन विकसित करण्यावर या प्रशिक्षणात भर दिला जाणार आहे.


आजच्या बदलत्या शेती व्यवस्थेमध्ये सततचे हवामान बदल, उत्पादन खर्चातील वाढ, बाजारातील अस्थिरता आणि कमी होणारे उत्पन्न यामुळे शेतकरी तणावाखाली जीवन जगत आहेत. या परिस्थितीत अडचणींना घाबरून न जाता त्या संधीमध्ये रूपांतरित करण्याची मानसिकता तयार होणे अत्यंत गरजेचे आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सह्याद्री फार्म्सने हे निवासी प्रशिक्षण आयोजित केले आहे.


या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना नेतृत्व कौशल्य, आत्मविश्वास वाढ, निर्णय क्षमता, शेतीतील नवकल्पना, समूह व्यवस्थापन, व्यवसायिक दृष्टीकोन आणि सकारात्मक विचारसरणी याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. ग्रामीण भागातील युवक व शेतकरी बांधवांना शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून नव्हे तर एक यशस्वी उद्योग म्हणून पाहण्याची प्रेरणा या प्रशिक्षणातून मिळणार आहे.


प्रशिक्षणासाठी नोंदणी शुल्क फक्त ₹५०० ठेवण्यात आले असून त्यामध्ये निवास व भोजनाची सुविधा समाविष्ट आहे. हे प्रशिक्षण २१ ते ५० वर्षे वयोगटातील शेतकरी बांधवांसाठी खुले आहे.


प्रशिक्षण दिनांक २८ ते ३० मे २०२६ (गुरुवार ते शनिवार) असे असून, सहभागी शेतकऱ्यांनी २७ मे रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत प्रशिक्षण स्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे.


हे निवासी प्रशिक्षण सह्याद्री फार्म्स येथे पार पडणार असून अधिक माहितीसाठी सुरेंद्र अपसिंगेकर यांच्याशी 7066071042 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


शेतीमध्ये बदलत्या काळानुसार विचारसरणी बदलण्याची गरज असून, “कर्ता शेतकरी” प्रशिक्षण हे शेतकऱ्यांसाठी नवी दिशा देणारे ठरणार असल्याची भावना अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत.


— भाऊसाहेब लवटे

संपादक, BBL Digital News

शेअर करा:
BBL News