शेती

“माझा शेती संकल्प खरीप 2025” या राज्यस्तरीय स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.

“माझा शेती संकल्प खरीप 2025” या राज्यस्तरीय स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.

“माझा शेती संकल्प खरीप 2025” या राज्यस्तरीय स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये नवकल्पना, संशोधन आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी तिफन फाउंडेशन व ग्रामसेतू ॲपच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या “माझा शेती संकल्प खरीप 2025” या राज्यस्तरीय स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला.

या स्पर्धेत राज्यभरातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये केलेले नवनवीन प्रयोग, बियाणांमध्ये संशोधन, तसेच कृषी विद्यापीठांनी विकसित केलेल्या नवीन वाणांचा वापर यांचे सादरीकरण करण्यात आले. या स्पर्धेतून संपूर्ण महाराष्ट्रातून १२ उत्कृष्ट शेतकऱ्यांची निवड करण्यात आली.

यामध्ये बीड जिल्ह्यातील श्रीमती शोभा भगवान काळे यांची निवड होऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

हा सन्मान सोहळा पुणे येथील PDCC बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री श्री. दत्तात्रेय (मामा) भरणे, कृषी आयुक्त सूरजजी मांढरे, तसेच तिफन फाउंडेशनचे पदाधिकारी व राज्यभरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीमती काळे यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या यशामुळे बीड जिल्ह्याचा मान उंचावला असून परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची प्रेरणा निर्माण होत असून शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

तिफन फाउंडेशनच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत असून, शेतकऱ्यांसाठी अशा स्पर्धा भविष्यातही आयोजित करण्याची मागणी होत आहे.

👉 या यशाबद्दल संबंधितांनी तिफन फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

शेअर करा:
BBL News