PMKSY 2025-26 अंतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेत वितरकांकडून अहवाल सादर करण्यास विलंब
बीड (प्रतिनिधी) – कृषी विभाग, बीड यांच्या वतीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) 2025-26 अंतर्गत सूक्ष्म सिंचन घटकाच्या अंमलबजावणीबाबत वितरकांकडून प्रगती अहवाल सादर करण्यात होत असलेल्या विलंबाबाबत गंभीर बाब समोर आली आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, शासनाच्या निर्देशानुसार वितरकांनी ठराविक नमुन्यात (परिशिष्ट-5 (क), (ख), (ग)) माहिती सादर करणे आवश्यक होते. मात्र अनेक वितरकांकडून ही माहिती अद्याप पूर्णपणे सादर झालेली नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित वितरकांनी दि. 10 मे 2026 पर्यंत सर्व आवश्यक माहिती संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, वितरकांनी सादर केलेल्या माहितीची पडताळणी करून जिल्हास्तरावर अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
कृषी विभागाने यासंदर्भात स्पष्ट केले आहे की, सूक्ष्म सिंचन योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना लाभ वेळेत मिळण्यासाठी वितरकांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे वेळेत अहवाल न सादर करणाऱ्या वितरकांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील सूक्ष्म सिंचन प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
✍️ भाऊसाहेब बाबासाहेब लवटे
संपादक – BBL डिजिटल न्यूज

