अंबड उपविभागातील पोलीस पाटील यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर संपन्न
जालना, दि. 01 एप्रिल 2026 – जालना जिल्ह्यातील अंबड उपविभागात पोलीस पाटील यांच्यासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पोलीस पाटील यांना कायदेशीर ज्ञान, जबाबदाऱ्या आणि आधुनिक काळातील सायबर गुन्ह्यांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोफाणी (IPS) यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच उपविभागीय अधिकारी (SDM) श्री. उमाकांत पारधी हे देखील उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांनी पोलीस पाटील यांना गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे, याबाबत मार्गदर्शन केले
तीन सत्रांमध्ये प्रशिक्षन
🔹 प्रथम सत्र : पोलीस कायदा
या सत्रात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ यांनी पोलीस कायद्याचे सविस्तर स्पष्टीकरण दिले.
🔹 द्वितीय सत्र : पोलीस पाटील यांची जबाबदारी व कर्तव्ये
पोलीस पाटील यांनी गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोणती जबाबदारी पार पाडावी, याबाबत सखोल माहिती देण्यात आली.
🔹 तृतीय सत्र : सायबर गुन्हे, पोक्सो कायदा व जनजागृती
या सत्रात सायबर गुन्हे, महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक कायदे (POCSO) आणि समाजात जनजागृती कशी करावी याबाबत सपोनि श्री. सचिन इंगोळे व पोउपनि श्री. योगेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन
हे प्रशिक्षण शिबिर पॉलिटेक्निक कॉलेज, पाचोड रोड, अंबड येथे सकाळी 11:00 वाजता आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक संतोष घोडके (पोलीस स्टेशन अंबड) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
महत्त्वपूर्ण संदेश
या शिबिरातून पोलीस पाटील यांना गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि माहिती मिळाली. तसेच सायबर गुन्हे आणि महिलांवरील अत्याचारांविरोधात जनजागृती करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली
📢 "जालना पोलीस – सदैव सेवेत, सुरक्षा व शांतता राखण्यासाठी कटिबद्ध!"
-

