जिल्हा वार्ता

बीडमध्ये लाचखोरीचा सापळा: अधीक्षक कपिल कांबळे रंगेहाथ अटकेत

बीडमध्ये लाचखोरीचा सापळा: अधीक्षक कपिल कांबळे रंगेहाथ अटकेत

🚨 बीडमध्ये लाचखोरीचा सापळा: अधीक्षक कपिल कांबळे रंगेहाथ अटकेत

बीड (प्रतिनिधी): लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत शासकीय निरीक्षण गृह बीड येथील अधीक्षकास ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.

आरोपी कपिल भिमराव कांबळे (वय ४३) हे कनिष्ठ संरक्षण अधिकारी असून, अतिरिक्त पदभार म्हणून शासकीय बाल निरीक्षण गृह, बीड येथे अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचे राहते घर पंचशील नगर, बीड येथे आहे.

📌 प्रकरणाचा तपशील

तक्रारदार हे पुण्यातील स्मार्ट सर्विसेस कंपनी मार्फत सुरक्षा रक्षक म्हणून बाल निरीक्षण गृह बीड येथे कार्यरत होते. सुरक्षा रक्षकांच्या हजेरीची नोंद करून ती दर महिन्याला कंपनीला पाठविण्याचे काम अधीक्षक कपिल कांबळे यांच्याकडे होते.

तक्रारदाराकडून:

कामावर रुजू करून घेण्यासाठी

हजेरी नोंद व रिपोर्ट पाठविण्यासाठी

कंपनीकडून ऑर्डर काढण्यास मदत केल्याच्या बदल्यात

४५,०००/- रुपयांची लाच मागण्यात आली होती.

🔍 ACB ची कारवाई

तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत दि. १३ एप्रिल २०२६ रोजी जालना ACB कडे तक्रार दाखल केली.

पंचासमक्ष पडताळणी दरम्यान आरोपीने:

३०,०००/- रुपये तत्काळ

उर्वरित १५,०००/- रुपये पगारानंतर घेण्याचे मान्य केले

यानंतर त्याच दिवशी पालवण चौक, बीड येथे आरोपीच्या कारमध्ये सापळा रचण्यात आला.

👉 आरोपी कपिल कांबळे यांनी तक्रारदाराकडून ३०,०००/- रुपये स्वीकारताच

👉 पोलीस उपअधीक्षक बी. एस. जाधवर (ACB जालना) यांच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली.

🔎 जप्ती

अंगझडतीमध्ये खालील वस्तू आढळल्या:

३०,०००/- रुपये लाचेची रक्कम

१००/- रुपये रोख

एक मोबाईल

दोन पिवळ्या धातूच्या अंगठ्या

⚖️ गुन्हा दाखल

या प्रकरणी आरोपीवर शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

📢 ACB चे आवाहन

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना यांच्याकडून नागरिकांना आवाहन:

👉 कोणताही शासकीय कर्मचारी लाच मागत असल्यास त्वरित संपर्क साधा:

☎️ ०२४८२-२२०२५२

📞 टोल फ्री: १०६४

📱 ९७६४०२१०६४

📧 Email: dysp.acbjalna@mahapolice.gov.in

शेअर करा:
BBL News