📰 सविस्तर बातमी (BBL Digital News)
उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते बीड जिल्ह्यात जनगणना 2027 स्वगणनेचा शुभारंभ
बीड, प्रतिनिधी – अनिल आरगडे
राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते आज बीड जिल्ह्यात जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.
या वेळी मा. पवार यांनी अधिकृत संकेतस्थळ https://se.census.gov.in� वर स्वतः लॉगिन करून स्वतःची माहिती भरत स्वगणनेची प्रत्यक्ष सुरुवात केली.
१ मे ते १५ मे या कालावधीत होणाऱ्या स्वगणना व घरगणना प्रक्रियेचा औपचारिक प्रारंभ यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी मा. विवेक जॉन्सन, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. जितीन रहमान तसेच पोलीस अधीक्षक मा. नवनीत कावत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मा. शिवकुमार स्वामी व उपजिल्हाधिकारी मा. शैलेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा जनगणना कार्यालयाच्या वतीने उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे व जिल्हा समन्वयक आशिष शिंदे यांनी स्वगणनेची सविस्तर माहिती दिली.
मा. सुनेत्राताई पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
"जनगणना ही देशाच्या नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. प्रत्येक नागरिकाने स्वगणनेत सहभागी होऊन अचूक माहिती द्यावी."
यावेळी नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले.
✍️ बातमी संकलन: अनिल आरगडे, बीड जिल्हा प्रतिनिधी
📰 संपादक: भाऊसाहेब बाबासाहेब लवटे
BBL डिजिटल न्यूज

