बीड जिल्ह्यातील तरुण व कार्यक्षम असे केज चे तहसीलदार यांचे आज सकाळी लातूर अंबाजोगाई महामार्गावर रेणापूर फाटा येथे अपघाती निधन.मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार राकेश गिड्डे हे स्वतःचे वाहन स्वतः चालवत होते.कारचा वेग अनियंत्रित झाल्यामुळे अचानक घडलेल्या या अपघातामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते.पुन्हा एकदा कार्यक्षम आणि लोकांना सेवा देण्यात तत्पर असणाऱ्या बीड जिल्ह्यातील व्यक्तीचा अपघाती मृत्यू होणे म्हणजे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यावर नियतीने अन्याय करण्यासारखेच आहे महसूल विभागात अतिशय कार्यक्षमपणे सेवा देणारे राकेश गिड्डे यांचा केज तालुक्यातच नव्हे तर पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून नावलौकिक होता. पुढील अधिक तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

