जिल्हा वार्ता

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज योजनेत सुधारणा; लाभार्थ्यांसाठी प्रक्रिया अधिक सुलभ

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज योजनेत सुधारणा; लाभार्थ्यांसाठी प्रक्रिया अधिक सुलभ

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्ज योजनेत सुधारणा; लाभार्थ्यांसाठी प्रक्रिया अधिक सुलभ


बीड : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारणेमुळे लाभार्थ्यांना आता संपूर्ण प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करता येणार आहे.


नवीन प्रणालीअंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक लॉगिनद्वारे अपूर्ण कागदपत्रांची माहिती पाहता येणार असून ती थेट ऑनलाइन अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कार्यालयीन फेऱ्या मारण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.


तसेच, “Hold” किंवा “Reject” झालेल्या प्रकरणांचे नेमके कारणही लॉगिनमध्ये स्पष्टपणे दिसणार आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित प्रकरण पुढील तपासणीसाठी पाठविले जाणार आहे.


महामंडळाने विशेष सूचना देत म्हटले आहे की, ज्या लाभार्थ्यांची प्रकरणे Hold किंवा Block झाली आहेत त्यांनी लॉगिन करून कारण तपासावे आणि १५ दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.


याशिवाय, कोणतीही अडचण असल्यास संबंधित जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता फक्त अधिकृत वेब प्रणालीद्वारेच प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


या डिजिटल सुविधेमुळे लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून योजना अधिक पारदर्शक आणि जलदगतीने राबवली जाणार आहे.

शेअर करा:
BBL News