जिल्हा वार्ता

बीड पोलीस दलात मोठे फेरबदल; तब्बल 40 अधिकाऱ्यांच्या बदल्या

बीड पोलीस दलात मोठे फेरबदल; तब्बल 40 अधिकाऱ्यांच्या बदल्या

बीड पोलीस दलात मोठे फेरबदल; तब्बल 40 अधिकाऱ्यांच्या बदल्या

बीड | प्रतिनिधी

बीड जिल्हा पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल करण्यात आले असून जिल्ह्यातील तब्बल 40 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत. या बदल्यांमुळे बीड शहर, शिवाजीनगर, केज, गेवराई, अंबाजोगाई शहर यांसह अनेक महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांच्या कारभारात बदल होणार आहे.

पोलीस अधीक्षकांनी प्रशासकीय कारणास्तव तसेच विनंती बदल्यांच्या आधारे ही प्रक्रिया अंतिम केली असल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी तसेच विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने या बदल्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाच्या बदल्या अशा :

पोनि विनोद गोलावे यांची पाटोदा पोलीस स्टेशनवरून बीड शहर पोलीस स्टेशन येथे बदली.

पोनि वैभव पाटील यांची CRO वरून ट्रॅफिक शाखेत नियुक्ती.

पोनि प्रविण बंगार यांची शिवाजीनगरवरून CRO येथे बदली.

पोनि उमाशंकर कस्तुरे यांची DYSP Home वरून पाटोदा पोलीस स्टेशन येथे नियुक्ती.

पोनि स्वप्नील उन्महवणे यांची केजवरून शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे बदली.

API संदीप मांजरमे यांची केजवरून युसुफ वडगाव येथे नियुक्ती.

API राजेंद्र घुगे यांची अंबाजोगाई शहरवरून धारूर येथे बदली.

PSI रमेश घुले यांची बरदापूरवरून अंबाजोगाई शहर येथे नियुक्ती.

अनेक पोलीस स्टेशनच्या प्रभारी पदांमध्ये बदल

याशिवाय जिल्ह्यातील अनेक सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक व पोलीस अधिकाऱ्यांना विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारीपद देण्यात आले आहे.

यामध्ये केज, सिरसाळा, नेकनूर, आष्टी, पिंपळनेर, अंभोरा, शिरूर कासार, गेवराई, माजलगाव शहर, तलवडा आदी ठिकाणी नवीन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

पिंक पथकातही फेरबदल

महिला सुरक्षा व सामाजिक गुन्हे नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या ‘पिंक पथक’ विभागातही मोठे बदल करण्यात आले आहेत. बीड, गेवराई, माजलगाव आणि अंबाजोगाई विभागातील पिंक पथकात नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशासकीय कामकाजाला गती

या बदल्यांमुळे जिल्हा पोलीस दलाच्या प्रशासकीय कामकाजाला अधिक गती मिळणार असल्याचे मानले जात आहे. आगामी काळात कायदा व सुव्यवस्था, गुन्हे उघडकीस आणणे, वाहतूक नियंत्रण आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी नव्याने नियुक्त अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भाऊसाहेब बाबासाहेब लवटे

संपादक – BBL डिजिटल न्यूज

शेअर करा:
BBL News