जिल्हा वार्ता

माहिती अधिकार प्रकरणात मलनिस्सारण विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

माहिती अधिकार प्रकरणात मलनिस्सारण विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

माहिती अधिकार प्रकरणात मलनिस्सारण विभागातील अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नवी मुंबई (प्रतिनिधी) – नवी मुंबई महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागातील माहिती अधिकार (RTI) प्रकरणात गंभीर अनियमितता उघडकीस आली असून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती अधिकार कायद्यानुसार मागवलेली माहिती अपूर्ण, दिशाभूल करणारी अथवा न दिल्यामुळे कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात जन माहिती अधिकारी तसेच संबंधित विभागीय अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारदार सुभाष सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 08 मार्च 2025 रोजी दाखल केलेल्या अर्जावर अपेक्षित माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा दाखला देत, माहिती न देणे, अपूर्ण माहिती देणे किंवा जाणीवपूर्वक दिशाभूल करणे हे गंभीर गुन्हे असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

तसेच, � नमूद केल्याप्रमाणे, भारतीय न्याय संहिता (BNS-2023) तसेच Public Records Act 1993 अंतर्गतही अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि कारवाईची तरतूद आहे.


तक्रारदारांनी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात FIR दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

✍️ भाऊसाहेब बाबासाहेब लवटे

संपादक – BBL डिजिटल न्यूज

शेअर करा:
BBL News